शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला जतची जागा राष्ट्रवादीलाच मिळणार : विलासराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 18:25 IST

आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीद्वारे लढविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोण कसे वागतो आणि काही भूमिका घेतो, यानंतर विधानसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी पक्की

जत : आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीद्वारे लढविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोण कसे वागतो आणि काही भूमिका घेतो, यानंतर विधानसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु जत विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी आम्ही नेत्यांकडे करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी येथे दिली.

जत तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित लढवणार आहेत, हे निश्चित झाले आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय भूमिका घेतात, ते पाहून विधानसभा निवडणूक आघाडीसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत जत तालुक्यातील सर्व कार्यकर्ते एकत्रित आणि एक दिलाने काम करणार आहेत. त्यासंदर्भात जिल्हा पातळीपासून गाव पातळीपर्यंत कार्यरत असणाऱ्या पदाधिकाºयांना आदेश देण्यात आले आहेत. पक्षाच्या बूथ कमिटीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

यावेळी प्रदेश संघटक ताजुद्दीन तांबोळी, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, पक्षनिरीक्षक राजू पाटील, कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जत तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बी. ए. धोडमणी, उत्तम चव्हाण, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, मीनाक्षी आक्की, सलीमा मुल्ला, शिवाजी शिंदे, विलास माने, मच्छिंद्र वाघमोडे, शंकरराव गायकवाड, फिरोज मुल्ला, जे. के. माळी, सिद्धू शिरसाट, किरण बिजरगी आदी उपस्थित होते.जलसंधारणाच्या कामाचा बोजवारा उडेल, म्हणूनच टँकर बंदजत तालुक्यात चारा व पाणीटंचाई आहे. जलसंधारणाच्या कामाचे जिल्'ाला बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे येथे टँकर सुरू करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. जलसंधारणाच्या कामाचा बोजवारा उडेल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. साठवण तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून भरून द्यावेत व येणारे वीज बिल आणि पाणीपट्टी टंचाई निधीतून भरावी, अशी मागणी विलासराव शिंदे यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस